विनायक दामोधर सावरकर


विनायक दामोदर सावरकर
Vinayak damodar savarkar.jpg
जन्म:मे २८इ.स. १८८३
भगूरनाशिक जिल्हामहाराष्ट्रभारत
मृत्यू:फेब्रुवारी २६इ.स. १९६६
दादर,मुंबई,महाराष्ट्र,भारत
चळवळ:भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना:अभिनव भारत
अखिल भारतीय हिंदू महासभा
धर्म:हिंदू
वडील:दामोदर सावरकर
आई:राधा सावरकर
पत्नी नाव:यमुनाबाई विनायक सावरकर
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (२८ मेइ.स. १८८३:भगूर - २६ फेब्रुवारीइ.स. १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी भाषेतील कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाला तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.
त्यांना स्वातंत्र्यवीर अशी उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक, पत्रकार, शिक्षक, चित्रपट दिग्दर्शक/निर्माते प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली.सावरकरांनी 1857 चा स्वातंञ्यसमर हा लेख लिहला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा