महात्मा ज्योतिबा


महात्मा ज्योतिबा फु
Mahatma Phule.jpg
जोतीराव गोविंदराव फुले
टोपणनाव:जोतिबा, ज्योतीबा.
जन्म:एप्रिल ११इ.स. १८२७
कटगुणसातारा,महाराष्ट्र
मृत्यू:नोव्हेंबर २८इ.स. १८९०
पुणेमहाराष्ट्र
प्रभावित:डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वडील:गोविंदराव फुले
आई:चिमणाबाई गोविंदराव फुले
पत्नी नाव:सावित्रीबाई फुले
अपत्ये:यशवंत
स्वाक्षरी:120px
जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय होता. त्यामुळे गोर्‍हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला.. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले व होले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.
प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. १८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा